VIDEO : Kolhapur | किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार, सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे. मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे. मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधला. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI