संत ज्ञानेश्वरांच्या जन्मभूमी पैठणमध्ये समाधी सोहळ्यात विज्ञानाचा साक्षात्कार

पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा सोहळा नुकताच 2 डिसेंबर रोजी पार पडला. कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींच्या मुखकमलावर या दिवशी झालेला किरणोत्सव सध्या मोठा चर्चेचा विषय ठरतोय. संपूर्ण आठवडाभर आकाशात ढग असताना समाधीच्या क्षणांनाच ढगांचा पडदा काही मिनिटे सरकला अन् सूर्यकिरणे मंदिरात प्रकटली. या क्षणासाठी खगोलशास्त्रज्ञ अन् वास्तुविशारदांनी केलेल्या तपस्येचं फळच जणू या दिवशी मिळालं..

संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांची जन्मभूमी म्हणजे पैठण (Paithan) तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव. कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर आळंदी तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावी म्हणजेच पैठण येथील आपेगावात (Apegaon) माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याची तिथी 2 डिसेंबर रोजी होती. अवघ्या जगाला विज्ञान आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी आपेगावातील भाविकांना विज्ञानाची  मोठी अनुभूती आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI