Sangamner Kirtan : कपाळी वारकरी टिळा अन् बुवाला नथुराम गोडसेचा कळवळा, वारकरी संप्रदायात नथूराम शिरला कसा?
स्वतःला कीर्तनकार म्हणवणार्या बाबांनी नथुराम गोडसेच्या नावाने धमकी दिली. वाद राजकीय किंवा विचारधारेचा असेल तरी कीर्तनकाराच्या तोंडी गोडसे कसा यावरून आता टीका होते आहे.
डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर भागवत धर्माचा बूक्का आणि तोंडी नथुराम गोडसेची भाषा… स्वतःला वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणणारे हे बुवा सध्या नथुराम गोडसेच्या विखाराची गाथा गातायत यांचं नाव संग्राम भंडारे आहे. संगमनेरच्या घुलेवाडीत त्यांचं कीर्तन होतं. कीर्तनात अफजल खान वधाचा प्रसंग सांगताना काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या लोकांनी गोंधळ घालून हाल्लाचा प्रयत्न केला, असा आरोप भंडारे आणि भाजप नेत्यांचा आहे. मात्र कीर्तनात संग्राम भंडारे वारकरी संप्रदायाऐवजी राजकीय विधानं करून अप्रत्यक्षपणे भाजपच्याही नेत्यांचा प्रचार करतात, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र कीर्तनात झालेल्या वादावादीनंतर भंडारे यांनी थेट थोरातांनाच नथुराम गोडसेच्या नावाने धमकी दिली. त्या विरोधात गुन्हा नोंदवा म्हणून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नेमकं काय घडलं बघा व्हिडीओ?
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

