पेंग्विननीच भरभराट केलीय, आता राज्याचंही… किशोरी पेडणेकरांचं रोखठोक!
मुंबईत पेंग्विन सेना उत्तम काम करतेय. परकीय, परदेशात जाऊन जे सुख पहायला मिळतं, ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं. त्यामुळे पेंग्विनने भरभराटच केलीय, असं उत्तर पेडकरणेकरांनी दिलंय.
मुंबईः पेंग्विनसेनेची तुम्ही काळजी करू नका. उलट पेंग्विननीच इथं भरभराट केली आहे. आणि पेंग्विन सेना राज्याचंही भलं करणार, असं वक्तव्य मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलंय. भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मुंबईत सध्या दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) गर्दी वाढवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेतील. पण पेंग्विन सेनेचे नेते सत्य सांगतील का अशी टीका राम कदम यांनी केली होती. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईत पेंग्विन सेना उत्तम काम करतेय. परकीय, परदेशात जाऊन जे सुख पहायला मिळतं, ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं. त्यामुळे पेंग्विनने भरभराटच केलीय, असं उत्तर पेडकरणेकरांनी दिलंय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

