Maharashtra Political crisis : राज्यात सत्तास्थापनेच्या हलचाली, दुसरीकडे शिवसेना नेत्यांना धमकीच पत्र

पत्र उघडून पाहिल्यानंतर सगळेच हादरलेत. निळ्या पेनानं हे पत्र लिहिण्यात आलं होतं. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी संतापही व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जणू काही मुघलाई असल्याचं भासवलं जाण्याचा प्रयत्न या पत्रातून केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jun 29, 2022 | 12:40 PM

मुंबई :  आताची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या पत्रामुळे एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. एकीकडे उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला (Uddhav Thackeray Floor Test) सामोरं जावं लागण्याची मोठी बातमी समोर आलेली असतानाच, आता पेडकरांना मारण्याची धमकी हाती आली आहे. दरम्यान, अत्यंत गलिच्छ भाषेत या पत्रातून धमकावण्यात आलंय, असं त्यांनी म्हटलंय. उरणमधून (Maharashtra Political crisis) हे धमकीचं पत्र आलं असल्याचं सांगितलं जातंय. लोअर परळ येथील घरी पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना एक मुलगी पत्र घेऊन आली होती. हे पत्र उघडून पाहिल्यानंतर सगळेच हादरलेत. निळ्या पेनानं हे पत्र लिहिण्यात आलं होतं. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी संतापही व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जणू काही मुघलाई असल्याचं भासवलं जाण्याचा प्रयत्न या पत्रातून केला जात असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या पत्राने आम्ही घाबरणारे नाही, असंही त्या म्हणाल्यात.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें