Kishori Pednekar : ठाकरेंना ‘लँड माफिया’ म्हणताच पेडणेकरांकडून ‘झोलर’ची आठवण, शेलारांना दिलं जशास तसं उत्तर
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये आशिष शेलार हे हिंदी भाषेत बोलताना ऐकायला मिळताय. मात्र आशिष शेलार यांच्या आवाजाच व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही
मुंबईतील सर्व लँड स्कॅमचे बादशाह हे उद्धव ठाकरे असल्याचे म्हणत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी टीका आहे. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात नेहमीच लँड स्कॅम असतं, असा घणाघातही आशिष शेलार यांनी केलाय. आशिष शेलार भाजपच्या कार्यशाळेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली. वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपकडून कार्यशाळेच आज आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आशिष शेलार म्हणाले, बीजेपीवाले जमिनी घेतील आणि अडाणीला देतील अंबानीला देतील अशी टीका ठाकरे करतायत. मुंबईत १ स्क्वेअर फुटची किंमत १ लाख रुपये आहे. तुमची २५ वर्ष पालिकेत सत्ता होती, मुंबईतील जमीन बिल्डरांना देण्याचं पाप हे उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न का विचारत आहेत. पण कोणतीही जागा बिल्डरला जाणार नाही हे मी आताच सांगतोय, असं आशिष शेलार म्हणाले. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. यावेळी किशोरी पेडणेकर यांच्याकडून आशिष शेलारांना ‘झोलर’ची आठवण करून देण्यात आली. बघा काय म्हणाल्या पेडणेकर?

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
