Kishori Pednekar : नको तिथं चोच मारायची… भाजपला खूश नाही केलं तर… निवेदिता सराफ यांच्यावर पेडणेकर भडकल्या
किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या बिहारमधील विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्या निवेदिता सराफ यांच्या विधानावरही टीका केली. "तुमचा काय संबंध? आपला काम करा पण नाही, चोच मारायचीच आहे," असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी बिहार निवडणुकीच्या निकालांबद्दल आनंद व्यक्त करत, मी भाजपची कट्टर फॅन आहे, असे विधान ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे केले. “मला फार आनंद झाला, मी फार पूर्वीपासून भाजपची फॅन आहे,” असे निवेदिता सराफ यांनी म्हटले होते. यावर ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या बिहारमधील विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्या निवेदिता सराफ यांच्या विधानावरही तीव्र शब्दांत टीका केली. यावर पेडणेकर यांनी, “तुमचा काय संबंध? कुठे काय झाल्यानंतर कधी येत नाहीत. आपलं काम करा पण नाही, चोच मारायचीच आहे कारण भाजपला खूश नाही केलं तर मोठी मोठी पारितोषिकं कशी मिळतील?” असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी आपली शैली वापरत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतल्याचे दिसून आले.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?

