Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांवर पोहोचली आहे. (Kolhapur Heavy rainfall river water level Increase)

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत एका रात्रीत सात फुटांची वाढ झाली आहे. त्यामुळे कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. (Kolhapur Heavy rainfall in dam area river water level Increase)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI