किरीट सोमय्या यांचे आरोप खरे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ नेत्याचं आव्हान

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 09, 2023 | 3:02 PM

आमदार हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिलंय. वारंवार केल्या जाणाऱ्या आरोपांना मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्याने आव्हान दिलंय. राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिलंय. किरीट सोमय्या वारंवार बेताल, चुकीची आणि गैरसमज पसरवणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप मुश्रीफांनी केलाय. किरीट सोमय्या यांचे आरोप खरे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देतो, असं आव्हानच त्यांनी दिलंय. आरोप करणाऱ्या मागील बोलवत्या धन्यांना लवकरच उघड करणार, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI