VIDEO : बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधब्याने धडकी भरवली, तुफान पावसाने रौद्ररुप

मागील 24 तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळेच नदी, नाले, ओढे यांप्रमाणे धबधब्यांना देखील मोठा प्रवाह आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर इथल्या धबधब्यानं देखील या पावसामुळे भीषण रूप धारण केलं आहे.

बदलापूर : मागील 24 तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळेच नदी, नाले, ओढे यांप्रमाणे धबधब्यांना देखील मोठा प्रवाह आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर इथल्या धबधब्यानं देखील या पावसामुळे भीषण रूप धारण केलं आहे. कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असून यंदा कोरोनाच्या नियमांमुळे तिथे पर्यटकांना जायला मनाई करण्यात आली आहे. मात्र गेल्या 24 तासांपासून ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोंडेश्वरच्या या धबधब्याला अतिशय भीषण असा प्रवाह आलाय. सोबतच नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. कोंडेश्वरच्या धबधब्याहून निघून भोज धरणामार्गे वाहणाऱ्या नदीला मोठा प्रवाह आला आहे. कोंडेश्वरचा धबधबा आजवर इतक्या मोठ्या भीषण स्वरूपात फक्त 26 जुलैच्या पावसाच्या वेळी कोसळला होता. त्यानंतर दरवर्षी धबधब्याला प्रवाह असला, तरी इतका मोठा आणि भयानक प्रवाह 26 जुलै नंतर आज पहिल्यांदाच आल्याचं स्थानिक सांगतात. कोंडेश्वरच्या या धबधब्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI