Sameer Wankhede : निकाहनामाचे पेपर सासूने बनवले होते, Kranti Redkar यांचा खुलासा
“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.
NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला आहे, त्यानंतर समीर वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नी आणि प्रख्यात मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी दावे फेटाळून लावत त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.
“स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे.
त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती” असं क्रांती म्हणाल्या.
Published on: Oct 27, 2021 07:44 PM
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा