Kurla Accident : कुर्ला बस अपघाताने मुंबई हादरली, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
रधाव वेगाने आलेली बस गर्दीत घुसली आणि अनेकांना चिरडलं तसेच 30 ते 40 गाड्यांनाही धडक दिली. या दुर्दैवी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. अपघातग्रस्त बस चालवणारा चालक संजय मोरे ( वय 54) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आ
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बसचा भीषण अपघात झाल्याने मुंबईकर हादरले. भरधाव वेगाने आलेली बस गर्दीत घुसली आणि अनेकांना चिरडलं तसेच 30 ते 40 गाड्यांनाही धडक दिली. या दुर्दैवी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. अपघातग्रस्त बस चालवणारा चालक संजय मोरे ( वय 54) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची भीत व्यक्त होत आहे. हा अपघात नेमका कसा घडला, त्यावेळी काय झालं, गोंधळ माजला, काय परिस्थिती होती, अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

