Sanjay Raut Uncut PC | संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची तयारी
राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम परत घेण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “जर कोणी बनावट कागदपत्रं किंवा भ्रष्ट मार्गाने सरकारी तिजोरीत हात घातला असेल, तर तो गुन्हा आहे. सरकारला हे माहिती असूनही लूट होत असेल, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे राऊत म्हणाले.
राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम परत घेण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “जर कोणी बनावट कागदपत्रं किंवा भ्रष्ट मार्गाने सरकारी तिजोरीत हात घातला असेल, तर तो गुन्हा आहे. सरकारला हे माहिती असूनही लूट होत असेल, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले. इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजकपदासाठी नितीश कुमार यांचे नाव पुढे आले होते, मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, असा दावा त्यांनी केला.
तसेच, ममता बॅनर्जी यांच्या पराभवाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “त्या पराभूत झालेल्या नाहीत, आम्ही त्या मताशी सहमत आहोत. इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्यांच्यासोबत उभे आहेत.” पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “निवडणुकीदरम्यान दबाव, अफवा आणि प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्यांच्या स्थिरतेवरही शंका व्यक्त केली.
या सर्व घडामोडींमुळे राज्यासह देशातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ‘लाडकी बहिण’ योजनेवरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

