नालासोपाऱ्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे असं म्हणत थेट विरोधकांना आव्हान केलंय. महायुती सरकारला एवढ्या जागा मिळाल्या तर तर हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. विरोधकांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री प्रति उत्तर देत म्हणाले, एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका हा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे त्यामुळे ही योजना सुरूच राहील कधीच बंद होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आव्हान करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लखपती दीदी योजनेबद्दल जनतेला माहिती दिली आहे. शेरो शायरी करत वसई विरारला विकासाकडे घेऊन जाण्याकरिता मी आलोय, जनतेची मदत मागायला मी आलोय असं थेट वक्तव्य फडणवीसांनी केलयं. तुम्ही महायुतीला निवडून द्या तुमच्या जीवनात एक नवीन परिवर्तन येईल असं म्हणत फडणवीसांनी जनतेला वचन दिलं आहे.