Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींना दणका! यात तुम्ही तर नाही ना? तब्बल 15 कोटींची रक्कम सरकार करणार वसूल
या सर्व सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्तविभागाने संबंधित विभागांना दिले आहेत. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे १५ कोटींच्या घरात असून, या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे.
महायुती सरकारने राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या या योजनेला महाराष्ट्रातील महिला वर्गाने मोठी पसंती दिली. या योजनेचे लाभार्थी देखील मोठ्या संख्येने आहेत. मात्र या योजनेत फसवणूक देखील झाल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वी समोर आला होता. गंभीर बाब म्हणजे पात्र नसताना आणि सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती.
अशाच लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजारांहून अधिक झाली आहे. या फसव्या बहिणींवर सरकारकडून अॅक्शन घेण्यात येणार आहे. या सर्वांकडून मिळालेला लाभ परत घेण्यासाठी शासन कठोर पाऊलं उचलणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. इतकंच नाहीतर 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेशही शासनाकडून देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर

