Ladki Bahin Yojana : राहतं घर धड नाही अन् म्हणे चारचाकी घरी.. मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा अर्ज बाद
रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील एका महिलेचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज तिच्या नावावर असलेल्या गाडीमुळे बाद करण्यात आला. ही महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते आणि तिची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. या घटनेमुळे गरजूंना मदत पोहोचण्यात अडचणी येत असल्याची चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कौंढर ताम्हाणे येथील एका महिलेचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद करण्यात आला. महिलेच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे कारण देत तिचा अर्ज नाकारण्यात आला. महिलेने सांगितले की, ती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि तिचे राहण्याचे घरही नीट नाही. तिच्याकडे चारचाकी गाडी कुठून असणार? असा सवाल करत या महिलेने ज्यांना गरज आहे त्यांना खरंच मदत द्या, अशी विनंती सरकारला केली आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर गरजूंना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने याबाबत योग्य ती तपासणी करून या योजने मार्फत गरजूंना मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
Published on: Sep 16, 2025 03:10 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

