VIDEO : Ganesh Chaturthi 2021 | लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेला विलंब, पोलीस-मंडळामध्ये चर्चा

| Updated on: Sep 10, 2021 | 12:54 PM

लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. 

VIDEO : Ganesh Chaturthi 2021 | लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेला विलंब, पोलीस-मंडळामध्ये चर्चा
Follow us on

लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणा पूजेस उशीर होत आहे. मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू असल्याने पूजेस उशीर झाला आहे. सकाळी 10.30 वाजता उत्सव गणेशमूर्तीची विधीवत पूजा सुरू करुन सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन सुरू करण्याचं नियोजन करण्यात आले होते.  लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे.