Latur : सत्तरी गाठलेल्या आजोबानं औत खांद्यावर घेऊन स्वतःच केली नांगरणी; Video पाहून काळीज पिळवटेल
लातूर जिल्ह्यातल्या हडोळती गावच्या एका वृद्ध दाम्पत्याला स्वतःला औताला जुंपून शेती करण्याची वेळ आली आहे, त्यांना शेतीचा खर्च परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या हडोळती गावच्या एका वृद्ध दाम्पत्याचा एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. हडोळती गावचं हे वृद्ध दाम्पत्या स्वतःच शेती करताना दिसताय. या वृद्ध दाम्पत्याला स्वतःला औताला जुंपून शेती करण्याची वेळ आली आहे. शेती परवडत नसल्याने हे दाम्पत्य स्वतः औत खांद्यावर घेऊन कोळपणी करताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. कोळपणीसाठी लागणारा मजुरीचा खर्च परवडत नसल्याने हे दाम्पत्य स्वतःच थोडं थोडं करून आपली पाच एकर जमीन कसत आहेत. पेरणीचा खर्च, कोळपणी, खुरपणी, फवारणी, तोडणी, रास अशा अनेक प्रकारचा खर्च परवडत नसल्याने हे सत्तरी गाठलेलं दाम्पत्य स्वतःच जमेल तशी शेती करत आहे. तर सरकारने अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घ्यावे अशी मागणी वजा विनंती या या वृद्ध दाम्पत्याने केली आहे.