AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?

CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?

| Updated on: Sep 23, 2026 | 11:59 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लातूर जिल्ह्यातील कोरड्या विहिरीची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या गंभीर व्यथा मांडल्या. पाऊस नसल्याने शेतातील पिकांना पाणी मिळत नाही. एका शेतकऱ्याने सांगितले की, एक किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि त्यांच्या दोन एकर शेतीला पाणी नसल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लातूर जिल्ह्यातील कोरड्या विहिरीची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या गंभीर व्यथा मांडल्या. पाऊस नसल्याने शेतातील पिकांना पाणी मिळत नाही. एका शेतकऱ्याने सांगितले की, एक किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि त्यांच्या दोन एकर शेतीला पाणी नसल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात सोयाबीन घेण्यास कोणी तयार नाही, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या ५० ते ६० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत, त्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत.

जनावरांना खायला चारा नाही आणि पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई आहे. अनेक शेतकऱ्यांनी २५-३० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेतल्याचे सांगितले, जे आता ५०-६० हजारांपर्यंत जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

Published on: Sep 23, 2026 11:59 AM

Follow Us