Latur : मुलींनी ट्रिपल सीट बेफाम स्कुटी चालवली, पोलिसांनी झापलं अन् लगावली कानाखाली, नंतर काय घडलं? बघा…
लातूरमध्ये स्कुटीवरून जाणाऱ्या तीन मुलींना अडवून पोलीस महिलेने शिवीगाळ केली आणि चांगल्याच कानाखाली मारल्या. याप्रकरणी आता त्या मुली पोलीस ठाण्यात पोहचल्या आहेत, पण नेमकं घडलं काय बघा?
लातूरमध्ये वेगाने स्कुटी चालवणाऱ्या मुलींना महिला पोलिसाने चांगलंच झापलं असल्याचे पाहायला मिळाले. मुली ट्रिपल सीट आणि वेगात स्कुटी चालवत होत्या, असं सांगत महिला पोलिसाने या मुलींच्या कानाखाली लगावली आहे. यानंतर मातृत्वाच्या भावनने बोलले असं म्हणत लातूरच्या महिला वाहतूक पोलीस प्रणिता मुसणे यांनी आपली प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. ‘माझ्या सोबत माझ्या दोन मुली होत्या. मी त्यांना पुढे गाठलं आणि त्यांना चांगलं सुनावलं त्यांच्या दोन कानाखाली ओढल्या. थोडं वेगळ्या भाषेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी मी माफी मागते. माझ्या तोंडून भावनेच्या भरात काही निघालं असेल. एक आई जसं बोलते तसं मी त्यांना बोलले. त्याबद्दल मी त्यांची, जनतेची, त्या मुलींच्या आई-वडिलांची माफी मागत आहे.’, असं महिला पोलीस प्रणिता मुसणे यांनी म्हटलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

