Latur News : लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
Latur Commissioner Gunshot : लातूरचे महापालिका आयुक्त मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. लातूरचे महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. लातूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पाठक मनोहरे यांच्या घरी दाखल झाले. मनोहरे यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर ज्या रिवॉल्वरने त्यांनी स्वत:वर हल्ला केला ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.
Published on: Apr 06, 2025 10:33 AM
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
