Laxman Hake : लाचार, चौथी फेल जरांगेंसमोर सरकारनं लोटांगण घातलं अन्…लक्ष्मण हाकेंची जिव्हारी लागणारी टीका
जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार आहेत. सरकारने जरांगेंसमोर लोटांगण घातल्याची टीका हाकेंनी केली. २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये ओबीसींचा भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही मराठा आमदारांना ओबीसी समाज आगामी निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही, असं क्ष्मण हाके यांनी नुकतेच जाहीर केले आहे. जरांगे पाटील यांच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ओबीसी समाज घरी बसवेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.
पुढे हाकेंनी सरकारवरही सडकून टीका केली ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटील यांच्यासमोर नुसता दबाव स्वीकारला नाही, तर अक्षरशः लोटांगण घातले आहे. या भूमिकेमागे सामाजिक न्याय हे प्रमुख कारण असल्याचे हाके यांनी नमूद केले. अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, अंबादास दानवे यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ज्यांनी जरांगे यांना पाठिंबा दिला, त्यांना ओबीसींची मते मिळणार नाहीत. दरम्यान, २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये ओबीसींचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, ज्यात लक्ष्मण हाके स्वतः सहभागी होणार आहेत. चंद्रपूर येथून हजारो कार्यकर्ते या मोर्चासाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

