AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मुख्य खुर्चीच बदलणार? वडेट्टीवार यांनी थेट खुर्ची बदलाची डेड लाईनच सांगून टाकली

VIDEO | मुख्य खुर्चीच बदलणार? वडेट्टीवार यांनी थेट खुर्ची बदलाची डेड लाईनच सांगून टाकली

| Updated on: Aug 19, 2023 | 10:56 AM
Share

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून मोठी विधाने समोर येत आहेत. यावेळी देखील त्यांनी मोठं विधान करून खळबळ उडणवून दिली आहे.

मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या मोठं विधान केलं होतं. त्यांनी अजित पवार आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं म्हटलं होतं. तर राज्यात लवकरच खुर्चीत बदल दिसेल असेही त्यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी यावरूनच मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बंद दाराआड बैठकीवरून टीका केली आहे. त्यांनी, बैठकीला कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे. तर हे तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाहीत. आणि हे सगळं जे चाललेलं आहे. ते सगळं आलबेल सुरू आहे. हे या महाराष्ट्रातील जनतेला सगळं नाटक, तमाशा दिसतोय. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पत घालवली. तर येत्या काही दिवसात सत्तेत बदल होईल असे मी म्हणत नाही, आमची सत्ता येईल असे म्हणत नाही. पण सप्टेंबरपर्यंत नक्कीच खुर्चीत बदल दिसेल असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Published on: Aug 19, 2023 10:56 AM