‘…फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते’; शिवसेना नेत्याचा सोमय्या यांच्यावरून भाजपवर हल्लाबोल
विरोधकांनी सोमय्या यांच्यांसह भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपाहार्य व्हिडियो सोशल मीडियावर झाला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे. विरोधकांनी सोमय्या यांच्यांसह भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी, भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते. तर सोमय्या यांच्यावरून काही महिन्यांपासून महिला आमच्याशी संपर्क साधत आहे. येत्या काळात त्यांचेच अनेक वेगळे विषय जनतेसमोर मांडू. पण आता सोमय्या यांनीच याप्रकणाच्या चौकशीची मागणी गृहमंत्र्यांना केली आहे. त्याचं स्वागत आहे. त्यामुळे ताबडतोब चौकशी करायला हवी. तर सभागृहात या प्रकरणावर योग्य ते पुरावे नक्कीच सादर करू असा इशाराच यावेळी दानवे यांनी दिला आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

