पांढऱ्याशुभ्रम दाट धुक्यात हरवला लोहगड परिसर, बघा मनाला भुरळ पाडणारी विहंगम दृश्ये
VIDEO | पुणे जिल्ह्यातील लोहगडच्या गोदाई पॉईंटवरून निसर्गाचं आणि धुक्याचं विहंगम दृश्य बघा ड्रोनच्या नजरेतून...
पुणे, ७ ऑगस्ट २०२३ | पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे… निसर्गाच्या किमयामुळे निसर्गनिर्मित अनेक धबधबे दऱ्या-खोऱ्यात प्रवाहित होताना दिसतात आणि हेच धबधबे पर्यटकांना खुणावत असतात. इतकंच कायतर त्याच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार एखाद्या शालूप्रमाणे भासू लागतो. हा सगळाच नजरा डोळ्यांना अगदी अल्हाददायक वाटतो. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पावसाचा जोर वाढला. त्यामुळे निसर्गाचा पाऊस आणि धुक्याचा लपंडाव लोणावळ्यातील लोहगड परिसरात दिसत आहे. त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक तयार झाले आहे. तर या वातावरणात पर्यटन करण्याची मजा वेगळी आहे, अंगावर शहारे येणारा थंडगार वारा पाऊस आणि धुक्यात हरवल्याचा आनंद जसा धर्तीवरचा स्वर्ग जमिनीवर उतरल्याचा भास होतो याच लोहगडच्या गोदाई पॉईंटवरून धुक्याच विहंगम दृश्य खास तुमच्यासाठी…
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

