Opinion Poll | मतदार राजाची पसंती कुणाला? आगामी लोकसभा निवडणुकीचा ओपीनियन पोल काय?
कोणत्याही निवडणुकीआधी ओपनियन पोलचे आकडे समोर येतात. या ओपनियन पोलच्या माध्यमातून कोणत्या राज्यात कुठल्या पक्षाचं सरकार येणार? कोण किती जागा जिंकणार? याचे ठोकताळे बांधले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील 'tv9 आणि EMBARGO ' चा ओपीनियन पोल समोर आला आहे.
मुंबई, १६ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ‘tv9 आणि EMBARGO ‘ चा ओपीनियन पोल समोर आला आहे. या पोलनुसार, उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला ७३ जागा तर इंडीया आघाडीला ७ जागा मिळणार आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपला ७० आणि काँग्रेसला १ जागा मिळणार आहे. यासोबत बिहारमध्ये एनडीएला ३८ तर इंडीया आघाडीला ३ जागा मिळणार असा अंदाज या ओपीनियन पोलमधून समोर आला आहे. पंजाबमध्ये आपला ११ जागा आणि भाजपला २ जागा मिळणार असून पंजाबमध्ये काँग्रेसचं एकही खातं उघडणार नसल्याचा अंदाज या पोलद्वारे समोर येत आहे. उत्तरप्रदेशात एकूण ८० जागा आहेत त्यापैकी भाजपा ७०, समाजवादी पार्टी ०६, काँग्रेस ०६, आरएलडी ०२ आणि अपना दल ला १ जागा मिळणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. बिहारमध्ये एकूण ४० जागा आहेत त्यापैकी भाजपा १७, काँग्रेस ०२, जेडीयू १५ आणि एलजेपी ०५ आणि एचएएमला १ जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Mar 16, 2024 03:03 PM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
