जळगावमधील एका लग्नाची ही दुसरी गोष्ट

आई-वडिलांसह तिचा भाऊ व बहिणी सर्वसाधारण उंचीचे आहेत. त्यामुळे दोघांच्या परिवारात उज्ज्वला व संदीपच्या लग्नाची चिंता होती; मात्र लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय या लग्नामुळे उघड झाला आहे.

महादेव कांबळे

|

May 26, 2022 | 10:46 PM

शहरात एक अनोख लग्न पार पडलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अस बोललं जातं. याचाच प्रत्यय जळगावमध्ये आला आहे. या लग्नात वर संदीप सपकाळे हा ३६ इंच उंचीचा तर वधू उज्ज्वला ही ३१ इंच उंचीची आहे. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. त्यामुळे जळगावात या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. संदीप हा परिवारात एकुलता आहे. त्याचे आई-वडील हे सर्वसाधारण उंचीचे आहेत. तर उज्ज्वलाला इतर तीन बहिणी व एक भाऊ आहे. आई-वडिलांसह तिचा भाऊ व बहिणी सर्वसाधारण उंचीचे आहेत. त्यामुळे दोघांच्या परिवारात उज्ज्वला व संदीपच्या लग्नाची चिंता होती; मात्र लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय या लग्नामुळे उघड झाला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें