लोअर परेल उड्डाणपुलासंदर्भात दिलासादायक बातमी समोर! उड्डाणपूल कधी येणार सेवेत? जाणून घ्या!
Lower Parel Bridge Update : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला लोअर परेल पूल लवकरच सुरु होण्याची शक्यता निर्माण झालीय. या पुलावरुन वाहतूक नेमकी कधी सुरु होणार? जाणून घ्या
मुंबई : लोअर परेल उड्डाणपुलाच्या (Lower Parrel Bridge) कामाबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. लोअर परेल उड्डाणपूल कधीपासून सुरु होणार, याची प्रतिक्षा अनेकांना आहे. हा मार्ग सुरु झाल्यानं वाहतूक कोंडीचाही (Mumbai Traffic Update) प्रश्न सुटेल. शिवाय वळसा मारुन येण्याचा त्रासही वाचणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोअर परेल उड्डाणपूल सुरु होण्याची गरज अनेकांकडून व्यक्त केली जात होती. अशातच आता रेल्वेनं महत्त्वाची माहिती दिलीय. येत्या वर्षात लोअर परेल उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु केली जाणार आहे. या पुलाचं काम जवळपास पूर्ण झालंय. विशेष म्हणजे दुसरा गर्डर बसवण्याचं कामही पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आलीय. तसंच पुलावरील किरकोळ कामंदेखील पूर्ण झाली आहेत, अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आलीय. लोअर परेल पूल धोकादायक असल्यानं या पुलावरील वाहतूक गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. या पुलावर पश्चिम रेल्वे आणि महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्तीचं काम सुरु होतं. अखेर आता ही कामं अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या पुलावरुन वाहतूकही सुरु करण्यात येणार आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

