Lucknow : विमानाच्या चाकातून ठिणग्या, मोठा धूर… अहमदाबादची दुर्घटना ताजी अन् लखनऊ विमानतळावर काय घडलं? बघा VIDEO
लखनऊच्या अमौसी विमानतळावर सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. विमानात हज यात्रेकरू होते. टॅक्सी-वेकडे जात असताना आग लागली. डाव्या चाकात बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.
अहमदाबाद विमान दुर्घटना ताजी असताना लखनऊमध्ये एक अनर्थ टळला. रविवारी सकाळी लखनऊमध्ये विमान लँड होत असताना सौदी अरेबियाच्या सौदी एअरलाईन्सच्या विमानाच्या पुढच्या चाकांमधून अचानक धूर येत असल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुदैवाने विमानाला कोणतेही नुकसान झाले नाही आणि सर्व प्रवासी विमानातून सुखरूप बाहेर पडले. या विमानातून एकूण २५० प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जेद्दाह येथून लखनऊला येत होते, लँडिंग करताना या विमानाच्या चाकांमधून धूर येऊ लागलाय दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि सौदी पथकासह परिस्थिती नियंत्रणात आणली.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया एअरलाइन्सचे विमान एसव्ही ३११२ शनिवारी रात्री ११:३० वाजता जेद्दाह विमानतळावरून टेकऑफ झाले. या विमानात २५० हज यात्रेकरू प्रवाशी होते. हे विमान रविवारी सकाळी ६:३० वाजता अमौसी विमानतळावर पोहोचले. माहितीनुसार, रनवेवर उतरल्यानंतर त्याच्या डाव्या चाकाजवळून धुराचे लोट निघू लागले. हे पाहून पायलटने वेळीच एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली आणि दुर्घटना होताना टळली.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
