Special Report | महाविकास आघाडीचा पहिलाच बंद… कुठं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची संतापजनक घटना घडली होती. याच घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची संतापजनक घटना घडली होती. याच घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खिरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. तर बंद दरम्यान राडा देखील झाला. तर कुठे दादागिरी देखील पाहायला मिळाली. याच बाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI