परळीत मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना मारहाण! गुन्हा दाखल
परळीत मृत महादेव मुंडेंच्या मुलाला अभ्यासिकेला जात असताना मारहाण झाली. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या मुलांपासून कुटुंबाला धोका असल्याचा आरोप करत पोलीस संरक्षणाची मागणी केली. पतीच्या हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गिते याला अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
परळी येथे मृत महादेव मुंडे यांच्या मुलाला अभ्यासिकेला जात असताना मारहाण करण्यात आली आहे. प्रणव मुंडे याला झालेल्या या मारहाणीनंतर परळी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणवच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्यांची ओळख विचारली आणि महादेव मुंडे यांचे नाव ऐकताच मारहाण केली.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलांना आणि परिवाराला वाल्मिक कराड यांच्या मुलांपासून धोका असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षेसाठी अर्ज केला असून, पतीच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गिते याला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी प्रवीण मुंडे आणि प्रणव मुंडे यांना ट्युशनहून परत येत असताना अडवून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती, असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी मुंडे कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली असून, याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
