AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 14 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 14 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 6:17 PM
Share

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पोलिसांचे कौतुक, तर, नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात यावं, अन्यथा बिमोड करणारचं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य,10 तास चकमक सुरु असल्याची माहिती

महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी

1. गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पोलिसांचे कौतुक, तर, नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात यावं, अन्यथा बिमोड करणारचं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य,10 तास चकमक सुरु असल्याची माहिती

2) शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक देवेंद्र फडणवीस यांना मान्य, विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ, शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; गोखलेंचं रोखठोक मत

3) दंगल भडकावण्याची ताकद रझा अकादमीत कधीच नव्हती; हा तर महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव, संजय राऊतांचा निशाणा, तर, जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

4) अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन, शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलग्रस्त भागात जाणार, तरुणांशी साधणार संवाद

5) कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा दावा, तर, एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

6) केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ईडी आणि सीबीआय प्रमुखांचा कार्यकाल 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा फैसला

7) खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शाहांना जाब विचारावा, संजय राऊत यांचं आव्हान