MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

स्वबळाची भाषा केल्याने पायाखालची वाळू सरकली, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) स्वबळाची भाषा केल्याने पायाखालची वाळू सरकली, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

2) मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केला नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलंय.

3) पटोलेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आघाडीला सुरुंग लावत असल्याचे म्हणत त्यांनी ही नाराजी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली आहे.

4) माहितीच्या अभावी नाना पटोले यांनी आरोप केले आहेत. सुरक्षा म्हणजे पाळत नव्हे असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

5) नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला कापरं भरलं आहे, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI