MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 21 October 2021

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकीलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय.

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकीलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. आर्यन खानच्या वतीनं जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्याकडून आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं, आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे.

आर्यन खानच्या वतीनं अ‌ॅड.सतीश मानेशिंदे आणि अ‌ॅड. अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं, आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे. उद्या साडेदहानंतर हायकोर्टाचं कामकाज सुरू होणार त्यावेळी सदर प्रकरण न्यायमूर्तीं समोर येण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI