MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 October 2021

एनसीबी ज्या प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरुन निश्चितपणे दाल मे कुछ काला है. एका मोठ्या नायकाच्या, शाहरुखच्या मुलाच्या विरोधात हे षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांच्या या आरोपांवर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना एनसीबीने अटक केलीय. कोर्टानं आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या प्रकरणावरुन एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्यन खानच्या अटकेवरुन भाजपवर गंभीर आरोप केलाय. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

एनसीबी ज्या प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरुन निश्चितपणे दाल मे कुछ काला है. एका मोठ्या नायकाच्या, शाहरुखच्या मुलाच्या विरोधात हे षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांच्या या आरोपांवर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI