समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:56 PM

मुंबई : कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik allegations ont Sameer Wankhede, Jasmine Wankhede recovered money from film industry)

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. 4-4 हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिकांच्या आरोपांना मनसेचं प्रत्युत्तर

नवाब मलिक यांच्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

आम्हाला समीर वानखेडे यांचाही अभिमान आहे. ड्रग्स विरोधात काम करणाऱ्या समीन वानखेडेच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. जाम्सिन वानखेडे यांच्यावर यापुढे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे ज्या-ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असं आव्हानच खोपकर यांनी दिलं आहे.

इतर बातम्या :

‘एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही’ संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एअरफोर्सचं ट्रेनी विमान क्रॅश! विमान जमिनीत रुतलं, पायलट जखमी

Nawab Malik allegations ont Sameer Wankhede, Jasmine Wankhed recovered money from film industry

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.