AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोट्या केसेस, दबावापुढे झुकणार नाही, महाविकास आघाडी कारवायांना सडेतोड उत्तर देणार’, मलिकांचा दावा

खोट्या केसेस आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलाय.

'खोट्या केसेस, दबावापुढे झुकणार नाही, महाविकास आघाडी कारवायांना सडेतोड उत्तर देणार', मलिकांचा दावा
नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 1:40 PM
Share

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोट्या केसेस दाखल करुन नेत्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे. मात्र, खोट्या केसेस आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. (Nawab Malik criticizes BJP and Modi government for misusing ED, CBI, IT)

ईडीच्या नोटीसमुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. दोन वर्षांपूर्वी अशीच ईडीची नोटीस पवारांनी आली आणि राज्यात आमचं सरकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. माझ्या जावयावर आरोप केले. मी कोर्टात लढत आहे. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? असा सवालही मलिक यांनी केलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका

नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदूंचे नेते म्हणून सांगतात. आता त्यात राज ठाकरे यात असतील तर चांगली गोष्ट आहे. नेते जनतेचे असतात. गर्व से कहो हम हिंदू है असं बोलायला त्यांनी सुरुवात केलीय. धर्माच्या राजकारणावर आम्ही राजकारण करत नाही, अशी टीका मलिक यांनी राज ठाकरेंवर केलीय. तसंच सर्वांना इदच्या शुभेच्छा दिल्या.

‘आर्यन खानच्या काऊन्सिलिंगचे व्हिडीओ जाहीर करा’

लेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्‍या एनसीबीच्या अधिकार्‍याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला.

एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का? अशी विचारणा करतानाच देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत असाही थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.

चंद्रकांत पाटलांना मलिकांचा टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय. त्याचबरोबर पवारांबद्दल आदर असल्याचंच पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. ‘ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटींच्या ठेवी अभासी! प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट, काँग्रेसचा दावा

विद्यापीठांकडून महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर, उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार

Nawab Malik criticizes BJP and Modi government for misusing ED, CBI, IT

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.