फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल, कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार, नवाब मलिकांची आक्रमक भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली.

फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल, कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार, नवाब मलिकांची आक्रमक भूमिका


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघासमोर प्रश्न उपस्थित केले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. त्यावरुन देखील मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.

तुमच्या काळातले घोटाळे लवकरच बाहेर काढणार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलंय की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं, यावर नवाब मलिकांना आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल. भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया का थांबत नाहीत

लोकांची हत्या होत आहे लोक जम्मू काश्मीर सोडून पलायन करत आहेत. आतंकवादी हल्ले थांबत नाहीत. सात वर्षांपासून तुमच्याकडं केंद्राचं सरकार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही काश्मीरमध्ये सरकार चालवत आहात. त्यापूर्वी तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेत होता. मग तेथील परिस्थिती का सुधारत नाही याचं उत्तर जनतेला देण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार संघाला नाही. जम्मू काश्मीरचं स्पेशल स्टेटस संपवूनही दहशतवादी कारवाया का थांबत नाही, असा सवाल नवाब मलिकांनी केलाय.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना  एक वर्षांपासून शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं. केंद्र शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. आंदोलन भटकेल  असं त्यांना वाटतं. लखीमपूर खेरी मध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करण्याऐवजी आंदोलन चर्चेतून सोडवलं आहे. शरद पवार त्यासंदर्भात सूचक वाक्य बोलत होते हे केंद्र सरकारला कळायला हवं, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपवाल्यांनी त्यावेळी थयथयाट केला

पेट्रोल डिजेलची सेंच्युरी पार झालेली आहे. युपीएच्या काळात ६० रुपये होते तेव्हा विचारलं की दर वाढले. भाजपवाले त्यावेळी सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असं आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आत्ता मोदींनी सांगावं की दर का वाढले. यूपीएच्या काळात भाजपवाल्यांनी तेव्हा थयथयाट केला, दिल्लीच्या निवडणुकीत मोदींनी सांगितलं की माझ्या नशिबांनी किंमत कमी झाली आत्ता सांगा कुणाच्या नशिबानं किंमत वाढतेय, हे सांगा असं नवाब मलिकांनी केला.

इतर बातम्या:

महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक

शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

Nawab Malik slam Devendra Fadnavis Narendra Modi and RSS over various issues like Jammu Kashmir Terrorist Attack Fuel rates and Farmers Protest

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI