AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही’ संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. तसंच हा घोटाळाही उघड करा, असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्यानंतर आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना राऊत यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केलीय.

'एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही' संजय राऊतांचा सोमय्यांना टोला
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 11:57 AM
Share

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका लावली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. तसंच हा घोटाळाही उघड करा, असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्यानंतर आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना राऊत यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. (Sanjay Raut alleges scam of Rs 700 crore in PCMC, Request to Kirit Somaiya to follow up for investigation)

एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरण पाठवावीत असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील 700 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केलाय.

संजय राऊतांना सोमय्यांना टोला

आमच्या पिंपरी-चिंचवडमधील ज्या नगरसेविका आहेत सुलभा उबाळे आणि इतर नगरसेवकांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायची असेल तर ती योग्य दिशेनं व्हावी आणि योग्य माणसाकडून ज्यावं, ज्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि ऊर्जा आहे. बाकी आम्हाला माहिती आहे कुणाकडे पुरावे द्यायचे आणि काय करायचं ते, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला आव्हान दिलंय.

संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला आहे. ईडी, सीबीआय आणि सोमय्यांनी चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असं आव्हान राऊत यांनी पत्राद्वारे केलाय. पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केलीय.

एक भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं असून ते अत्यंत गंभीर आहे. त्यात तुम्ही लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर नगरसेविका सुलभा उबाळे आणि अन्य काही नगरसेविकांनी काही कागदपत्रं दिली. त्यातून असं दिसून येतं की पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्या. तुम्ही हा घोटाळा उघडकीस आणावा, अशी मी विनंती आहे. 2018 – 2019 या काळात काही कोटींचा घोटाळा स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्याचंही सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

महाज्योती संस्था ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी की त्यांना त्रास देण्यासाठी? गोपीचंद पडळकरांचा सवाल

हे फक्त बाई आणि आईच करु शकते, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्युटीवर!

Sanjay Raut alleges scam of Rs 700 crore in PCMC, Request to Kirit Somaiya to follow up for investigation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.