MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 July 2021
गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले
राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात दोन्ही नेत्यांच्या गाड्या कैद झाल्या आहेत. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट

