भू-विकास’ बँकेचे कर्ज होणार माफ, यासह पहा इतर बातम्या महाफास्ट न्यूज 100
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारची नुकसान भरपाईची घोषणा फक्त कागदोपत्री असल्याचे म्हटलं आहे.
राज्यात परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे. अनेक जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी केली होती. त्यावर आता झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ‘भू-विकास’ बँकेतून कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला. याचदरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारची नुकसान भरपाईची घोषणा फक्त कागदोपत्री असल्याचे म्हटलं आहे. तर राज्यात याच्याआधी झालेल्या विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलनात भाग घेतलेल्या आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासाठी दिलासा दायक बातमी आहे. 30 जून 2022 पर्यंतचे राजकीय आणि सामाजिक दाखल गुन्हे सरकार मागे घेणार आहे. याचीही घोषणा आजच्या कॅबिनेट बैठकीत करण्यात आली.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर

