Video : 36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 4 October 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा दौरा केला. लातूर जिल्ह्यात त्यांनी मांजरा नदीची पाहणी केली. त्यावेळी धरणातून पाणी ज्या प्रकारे सोडण्यात आलं त्यामुळे नदी लगतच्या शेतीला त्याचा फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे त्याची चौकशी करावी, तसंच त्याबाबत एक एसओपी तयार करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे.

शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. त्यामुळे निकषांच्या बाहेर जाऊन मदत करावी लागेल. राज्य सरकारने गप्पा बंद कराव्यात, तुमचं राजकारण होत मात्र शेतकऱ्यांच मरण होत, असा आरोप केला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक घ्यावी. मुख्यमंत्री यांनी दसऱ्यापूर्वी मदत न केल्यास भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI