Anandacha Shidha Scheme : ‘आनंदाचा शिधा’ गणेशोत्सवपाठोपाठ दिवाळीलाही मिळणार नाही? योजना होणार बंद!
राज्यातील आर्थिक परिस्थितीमुळे गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता आहे. दिवाळीसाठी निधीचा प्रस्ताव तयार न झाल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही निधी उपलब्ध नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेविना निधीअभावी योजना कागदावरच राहण्याची शक्यता असून, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थितीचा विचार करता ही योजना कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता दिवाळीलाही नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी कोणताही निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या योजनेसाठी केवळ समन्वयक म्हणून काम करत असून, ही त्यांच्या खात्याची योजना नसल्याने त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वाटपासाठी आवश्यक असलेला निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या या माहितीमुळे दिवाळीत आनंदाचा शिधा मिळण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात वरिष्ठ मंडळी उचित निर्णय घेतील आणि शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

