Maharashtra Assembly Session : भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल, पहिल्या दिवसापासून तुम्ही सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला, जाधव यांचा आरोप

'तुम्ही कुणाच्या हातात भोंगा दिला, कुणाच्या हातात हिजाब दिला, कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिला. तर कधी महाराष्ट्रात सुशांत सिंह राजपूत आणला, कधी महाराष्ट्रात कंगना राणावत आणली, पण सत्ता उलथली गेली नाही,' अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jul 04, 2022 | 2:22 PM

मुंबई :  आज विशेष अधिवेशनात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘पहिल्या दिवसापासून तुमची कृती सत्ता उलथवून टाकण्याची होती. महाराष्ट्राची सत्ता उलथवून टाकण्याच्या तुमचा प्रयत्न होता. ती संधी तुम्ही साधली. तुम्ही कुणाच्या हातात भोंगा दिला, कुणाच्या हातात हिजाब दिला, कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिला. तर कधी महाराष्ट्रात सुशांत सिंह राजपूत आणला, कधी महाराष्ट्रात कंगना राणावत आणली, पण सत्ता उलथली गेली नाही, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला. तसेच आता तुमच्यासोबत एकीकडे 40 आमदार आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना (shivsena) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही काय कराल? असा सवाल जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें