Gulabrao Patil: तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज चांगलीच खडाजंगी झालेली बघायला मिळाली.
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी बाकावरील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी फडणवीस सरकारवर थेट हल्ला चढवत टीका केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. यामुळे तालिका अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागल्याचे बघायला मिळाले.
शिवसेना (उबाठा) आमदार वरुण सरदेसाई यांनी सभागृहात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. या जमिनीवर सध्या 9,483 झोपड्या असून, तेथील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. हा प्रश्न सरकार केव्हा निकाली काढणार? आणि याबाबत सरकारने आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला? असा थेट सवाल सरदेसाई यांनी सरकारला विचारला.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

