Aurangabad Rain | पुराच्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न अंगलट, बैलगाडीच वाहून गेली

पुराच्या पाण्यातून बैलगाडी काढण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न सुरू होता, मात्र पाण्याचा वेग आवरता न आल्यामुळे बैलांसकट बैलगाडी वाहून गेली. बैलगाडी वाहून जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे

औरंगाबादेत पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपरखेड परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बैलासकट बैलगाडी वाहून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुराच्या पाण्यातून बैलगाडी काढण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न सुरू होता, मात्र पाण्याचा वेग आवरता न आल्यामुळे बैलांसकट बैलगाडी वाहून गेली. बैलगाडी वाहून जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हळहळले आहेत. याआधीही पुराच्या पाण्यातून वाट काढताना बैलगाडी वाहून गेल्याचे प्रकार समोर आले आहेत, त्यामुळे धोक्याची जाणीव वारंवार केली जाऊनही अनेक जण पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI