राज ठाकरे उपचाराधिन श्री सदस्यांची भेट घेणार, रूग्णांची करणार विचारपूस

राज ठाकरे उपचाराधिन श्री सदस्यांची भेट घेणार, रूग्णांची करणार विचारपूस

Harshada Shinkar | Updated on: Apr 17, 2023 | 9:34 AM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसदस्यांची विचारपूस करणार

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ असल्याने नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या श्री सदस्यांना भेट दिली. यासोबतच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री रुग्णालायत जाऊन रुग्णांची विचारपूस केली. आता मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करणार आहेत. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. तर हा कार्यक्रम सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे

Published on: Apr 17, 2023 9:28 AM
Follow Us