महाराष्ट्र भूषण पुरस्कार आरोपावरून बावनकुळे यांचा विरोधकांना टोला, म्हणाले…
विरोधकांच्या या अरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे लोक जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
नागपूर : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 लोक उष्माघाताने दगावले. यावरून शिंदे-फणवीस सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारमधील नेत्यांवर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोहळ्यावरून विरोधक मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांच्या या अरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे लोक जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गिरीश महाजन, तानाजी सावंत यांचे याठिकाणी लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते या प्रकरणावर लक्ष ठेवून ठेवत आहेत. विरोधकांना आरोप करायला काय लागत नाही. आरोप करणे, हे त्यांचे काम आहे.

