अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; मुख्यमंत्री 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कामकाजाची सुरुवात केली. अजित पवारांच्या अपघातासह पार्थ पवारांवरील आरोप, मुंडवा जमीन घोटाळा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करतील.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून प्रारंभ झाला. कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर हे नेते अभिवादनासाठी पोहोचले होते.
या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संभाव्य घातपाताच्या शंकांवर तसेच पार्थ पवारांवरील गंभीर आरोप, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. अजित पवार यांच्या निधनानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. दिवंगत अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनीच अर्थसंकल्प सादर केला असता, अशी प्रतिक्रिया काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. TV9 मराठीने या कामकाजाची एक्सक्लुझिव्ह दृश्ये दाखवली आहेत.