Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे महत्त्वाचे मुद्दे

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

Updated on: Aug 09, 2022 | 1:29 PM

विस्ताराच्या पहिल्या टप्यात फडणवीसांच्या निकटवर्तीयांना संधी मिळाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अपक्ष आमदारांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार बच्चू कडू यांचा क्रमांकसुद्धा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात लागलेला नाही.

आज राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडत आहे. शिंदे आणि भाजप सरकारच्या एकूण 18 आमदार शपथ ग्रहण करणार आहे यात शिंदे सरकारच्या नऊ आणि भाजप सरकारच्या नऊ आमदारांची वर्णी लागली आहे. भाजपच्या आरोपानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांनासुद्धा मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्यात फडणवीसांच्या निकटवर्तीयांना संधी मिळाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अपक्ष आमदारांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार बच्चू कडू यांचा क्रमांकसुद्धा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात लागलेला नाही. पहिल्याच टप्यात औरंगाबाद जिल्ह्याला मात्र लॉटरी लागलेली आहे. भाजपमधून तीन तर शिंदे गटाकडून एक असे तीन मंत्री औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले आहेत. मुख्य म्हणजे आरोप झालेल्या चार आमदारांनीसुद्धा शपथ घेतली आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI